खंडकरी शेतक-यांना न्याय देणार; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:09 PM2021-01-03T13:09:41+5:302021-01-03T13:10:25+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
श्रीरामपूर : तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. मंत्री थोरात म्हणाले, येथील अकारी पडीक जमीन वाटपाला चालना देण्यासाठी श्रीरामपुरात शेतकर्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर मुंबई येथे आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांना सोबत घेऊन सचिव स्तरावर दोन वेळा बैठका घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गंभीर आहोत.
खंडकरी शेतकर्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेले हजारो हेक्टरवरील जमीन वाटप ऐतिहासिक ठरले. श्रीरामपूरमध्ये अत्यंत नियोजनबद्धरित्या ही पक्रिया पार पडली. त्यात दिवंगत नेते जयंत ससाणे यांची मोलाची भूमिका राहिली. मात्र काही मंडळींनी चांगले काम करूनही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, असे थोरात म्हणाले.