पाथर्डी येथे खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:01+5:302021-02-05T06:27:01+5:30
पाथर्डी : परंपरेप्रमाणे येथे पौष पौर्णिमेच्या दिवशी खंडोबा व म्हाळसादेवी यांचा दैवी विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. शुक्रवारी ...
पाथर्डी : परंपरेप्रमाणे येथे पौष पौर्णिमेच्या दिवशी खंडोबा व म्हाळसादेवी यांचा दैवी विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
शुक्रवारी सायंकाळी कसबा पेठेतून भैरवनाथ मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्ग सडा रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. भंडाऱ्याची उधळण व देवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. भाविकांनी मिरवणुकीमध्ये अत्यंत श्रद्धेने विविध कला प्रकार सादर केले. सायंकाळी सदानंद निवाससमोर देव विवाहाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने झाला.
वेदशास्त्रसंपन्न सचिन देशपांडे, संजय मुळे, देशमुख देवा, आधी ब्रह्मवृंदांनी मंगलाष्टके गायली. सर्व भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. शहरातील खंडोबा भक्त रमण लाहोटी, रामेश्वर लाहोटी, संजय बाहेती, रामनाथ परदेशी, ओमप्रकाश लाहोटी यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मंगलताई भालेराव, जयंती भालेराव, रेणुका पतसंस्थेचे व्यवस्थापक अश्वलिंग जगनाडे, नगरसेविका मंगल कोकाटे, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब मर्दाने आदी उपस्थित होते.
सोहळ्याचे मुख्य संयोजक अशोक साठे, परिमल बाबर, शुभम शेळके, अनिल साठे, अजय साठे, योगेश डोंगरे, खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सिंधू साठे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो : ३१ पाथर्डी१
पाथर्डी येथे खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.