खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:26 PM2021-01-18T12:26:30+5:302021-01-18T12:27:23+5:30
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे.
खारेकर्जूने येथे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या गटाची गेल्या ६५ वषार्पासून अबाधित सत्ता होती. परंतु मागील वेळी येथे शेळके यांच्या गटाचा पराभव झाला होता. यावेळी स्व. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांच्या गटाने विरोधी गटाचा ११ पैकी ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.
खंडाळा ग्रामपंचायतीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या गटाने ९ पैकी ६ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. परंतु कारले यांच्या चुलत भावाला पराभव पत्करावा लागला.