‘वृद्धेश्वर’च्या तज्ज्ञ संचालकपदी खेडकर, काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:25 AM2021-09-17T04:25:40+5:302021-09-17T04:25:40+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू ठरलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी उषा पांडुरंग खेडकर व नारायण काकडे ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू ठरलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी उषा पांडुरंग खेडकर व नारायण काकडे यांची निवड करण्यात आली.
कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. त्यामध्ये तज्ज्ञ संचालकपदी जि. प.च्या समाज कल्याण समितीच्या माजी सभापती स्व. पांडुरंग खेडकर यांच्या पत्नी उषा खेडकर यांना संधी देण्यात आली.
नारायण काकडे हे कोरडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत. यावेळी उपाध्यक्ष रामकिसन काकडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, सुभाषराव ताठे, सुभाषराव बुधवंत, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, शरदराव अकोलकर, विधिज्ञ अनिल फलके, डॉ. यशवंत गवळी, कुशीनाथ बर्डे, कोंडिराम नरोटे, शेषराव ढाकणे, सिंधुबाई जायभाय, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार, आदींसह प्रशासन अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी केले. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी आभार मानले.
----
१६ उषा खेडकर, नारायण काकडे