खरवंडी कासारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बँकेसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 03:32 PM2020-04-16T15:32:05+5:302020-04-16T15:32:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टाकळीमानूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. मात्र पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियासमोर पंतप्रधान जनधन योजना, उज्वल व निराधार पेन्शन योजना पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दीची झुंबड उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळीमानूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. मात्र पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियासमोर पंतप्रधान जनधन योजना, उज्वल व निराधार पेन्शन योजना पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दीची झुंबड उडाली आहे.
खरवंडी कासार येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथील बाजारपेठ मोठी असून व्यापाºयांचे दैनंदिन व्यवहार याच बँकेतून होतात. नेहमीच या बँकेत गर्दी असते. बँकेत सुरक्षा रक्षक कार्यरत नसल्याने ग्राहकांची सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून रांग लावली जात नाही. बुधवारी व गुरुवार बँकेसमोर मोठी गर्दी होती. हातावर पोट भरून मजुरी करणारे आर्थिक संकटात असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी पाचशे व हजार रुपये आवश्यक झाले आहेत. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करीत लोक गर्दी करीत आहेत. बँके समोरील गर्दी पाहता जमावबंदी आदेशाचा भंग होत आह.े रविवारी असणारा आठवडे बाजार बंद असला तरी सकाळी मोठी गर्दी दिसून येते. किराणा दुकानासमोर ग्राहकांना लाईनमध्ये उभे राहण्यासाठी ठरावीक अंतरावर खुणा केल्या जात असल्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. एकंदरीतच ग्रामीण भागातील संचारबंदीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.