अपहरण झालेल्या कांदा व्यापा-याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:06 AM2020-08-28T11:06:57+5:302020-08-28T11:08:41+5:30
अवघ्या तीस हजार रुपयांसाठी भावडी येथील कांदा एंजट माऊली मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील व्यापा-यांनी अपहरण केले होते. श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासात पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर टोल नाक्यावर नाकेबंदी करून त्यांची सुटका करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती.
Bश्रीगोंदा : अवघ्या तीस हजार रुपयांसाठी भावडी येथील कांदा एंजट माऊली मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील व्यापा-यांनी अपहरण केले होते. श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासात पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर टोल नाक्यावर नाकेबंदी करून त्यांची सुटका करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती.
सदर घटनेबाबत अपहरण झालेल्या लांडगे यांचे बंधू सोन्याबापू लांडगे यांच्या फिर्यादीवरून कर्नाटक येथील व्यापारी एच. एम. बागवान व त्याच्यासोबत असलेले अनोळखी चार ते पाच इसम यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भावडी येथील माउली लांडगे हे कांदा व्यापारी असून कर्नाटक येथील व्यापारी एच. एम. बागवान याने कांदा व्यापारासाठी चार ते पाच दिवसांपूर्वी लांडगे यांच्या खात्यावर उचल म्हणून एक लाख रुपये टाकले होते. सोन्याबापू लांडगे यांनी उचल पोटी घेतलेल्या एक लाखापैकी ७० हजार रुपये बागवान याला दिले.
श्रीगोंदा शहरातील आर. के. इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून कर्नाटक येथील व्यापारी बागवान व त्याच्या सहकाºयांनी त्याच्या इर्टीका कार क्रमांक के.ए.-२०, झेड ६५०९ यामध्ये ज्ञानदेव लांडगे यांचे अपहरण केले.
पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन घेतले. दौंडचे पोलीस निरीक्षक सचीन महाडिक यांना संपर्क साधत अपहरणकर्त्यांची माहिती दिली. परंतु तोपर्यत अपहरणकर्ते इंदापृरच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी इंदापूर पोलीस निरीक्षक सारंगधर यांच्याशी संपर्क साधला. इंदापूर पोलिसांनी हायवेला सापळा लावून एका टोलनाक्यावर सदर अपहरणकर्त्यांची गाडी अडवून अपहरणकर्त्यांना ताब्यात घेत अपहरण झालेले ज्ञानदेव लांडगे यांची सुटका केली.