कोथूळ सोसायटी सचिवाचे अपहरण; नाहटा, पानसरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:34 AM2020-01-13T11:34:36+5:302020-01-13T11:35:46+5:30
कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीगोंदा : कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कोथूळ संस्थेचे सचीव राजेंद्र मधुकर (खोल्लम, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांचे शनिवारी (दि.११ जानेवारी) नाहटा, पानसरे व त्यांच्या सहकाºयांनी अपहरण केले. त्यांंना एका निर्जनस्थळी खोलीत डांबून ठेवले. रविवारी होणाºया सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीस हजर राहिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील धमकी दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दत्तात्रय भाऊसाहेब, पानसरे, बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नाहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे यांच्या विरोधात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचा ठराव घेण्यातून ही घटना घडल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
आरोपींनी बैठकीस गैरहजर रहावे म्हणून सचिव राजेंद्र खोल्लम यांना पिंपळगाव पिसा येथून मोटारसायकल बसविले. नंतर घारगाव येथे आणले. यानंतर चार चाकी वाहनातून पुणे कृषी विद्यापीठात जबरदस्तीने बसवून नेले. सोसायटीचा चार्ज का आणला? असे म्हणून उद्याचा ठराव झाला तर तुला गाडीखाली चिरडून मारून टाकू? असा दम दिला. यानंतर त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवले. आरोपी क्रमांक २ ते ८ यांनी ठराव झाला तर तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे करीत आहेत.
राजकीय संघर्षातून घटना
सध्या जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी सोसायटी प्रतिनिधीचे ठराव करण्याचे काम चालू आहे. माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे हे आमने-सामने उतरणार आहेत. आपल्या बाजूचे ठराव संमत होण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे राजकीय संघर्ष उफाळू आला आहे. त्यामुळे सचिवांची कोंडी झाली आहे.