स्क्रॅप व्यवसायाच्या भागीदारीतील वादातून तरुणाचे अपहरण
By शेखर पानसरे | Published: April 18, 2023 02:06 PM2023-04-18T14:06:29+5:302023-04-18T14:08:07+5:30
मोबीन मलिक यांचा त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला.
संगमनेर (अहमदनर) : स्क्रॅप व्यवसायाच्या भागीदारीतील वादामुळे तरुणाचे अपहरण करण्यात आले. शनिवारी (दि.१५) रात्री एक वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील समनापूर परिसरातील फ्लॉवर मार्केट चौफुली येथून मोबीन मुख्तार मलिक उर्फ सज्जू (वय ३८, रा. संगमनेर) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्या विरुद्ध मोबीन मलिक यांचा भाऊ अशफाक मुख्तार मलिक (वय २५, रा. मलिक स्टील प्रीतम ट्रेंडिंग कंपनी शेजारी, समनापूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोबीन मलिक यांचा त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला. त्यानंतरही ते मिळून न आल्याने व्यवसायाच्या भागीदारीतील वादातून त्यांना पळवून नेण्यात आले. असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश धादवड अधिक तपास करीत आहेत.