आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील संकेत पुरोहित यांना किडनी योद्धा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:17 AM2021-01-02T04:17:07+5:302021-01-02T04:17:07+5:30
किडनी वारियर्स फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसुंधरा राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत दुबई येथून ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात ...
किडनी वारियर्स फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसुंधरा राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत दुबई येथून ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विवेकानंद झा, डॉ. सुंदर शंकरन, डॉ. विजय खेर, डॉ. भारत शाह, डॉ. मोहन राजापूरकर हे यात परिषदेत सहभागी झाले होते. भारतातील चार जणांना किडनी योद्धा पुरस्कार देण्यात आला. यात महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार संकेत पुरोहित यांना देण्यात आला. पुरोहित हे गेल्या दहा वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या काळात त्यांनी मूत्रपिंड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले तसेच रुग्णसेवा दिली. या कार्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. पुरोहित यांना आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. गोविंद कासट यांच्यासह सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलने एकाच छताखाली अनेकाविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या असून २४ तास अविरत तत्पर सेवा दिली जाते. गेल्या वीस वर्षांपासून असंख्य रुग्ण या दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. हास्पिटलमधील डायलेसिस विभागात २१ फेरजिनइस मेडिकलचे डायलेसिस मशिन्स उपलब्ध आहेत. दर महिन्याला याठिकाणी दोन हजारांहून अधिक डायलेसिस केली जातात. प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ, तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्ट या विभागात आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांवर डायलेसिस सेवा मोफत केली जाते. (वा. प्र.)
--
फोटो- ३१ संकेत पुरोहित