पक्ष्यांचा राजा उपचारासाठी पुण्याला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:11+5:302021-07-07T04:26:11+5:30
काष्टी : नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील गिरमकर यांच्या उसाच्या शेतातील जखमी अवस्थेतील पक्ष्यांचा राजा असलेल्या मोरावर प्राथमिक उपचार ...
काष्टी : नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील गिरमकर यांच्या उसाच्या शेतातील जखमी अवस्थेतील पक्ष्यांचा राजा असलेल्या मोरावर प्राथमिक उपचार करून पुणे येथील प्राणी उपचार केंद्रात पाठविण्यात आले. सुनील गिरमकर यांना त्यांच्या उसाच्या शेतात मृत्यूशी झुंज देत असलेला मोर शनिवारी सकाळी आढळला. त्यांनी काष्टी येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संतोष जठार यांच्याशी संपर्क साधला. जठार व वन कर्मचारी संभाजी शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोरावर प्राथमिक उपचार केले.
दौंड येथील प्राणी मित्र संघटना व इको संस्था यांच्या रेस्क्यू पथकाच्या मदतीने त्या मोराला पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. दौंड येथील इको प्राणी मित्र संघटनेचे नचिकेत अवधानी, योगेश कराळे, करण नगरे, आनंदवाडी येथील दादा ढमढेरे, किसन गिरमकर यांनी या वेळी मदत केली.
---
०५ काष्टी पिकॉक