किसन कोठुळे डीजी डिस्कने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:41+5:302021-05-05T04:33:41+5:30
केडगाव : खडकी (ता. नगर) येथील जवान किसन भिवसेन कोठुळे यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) मध्ये गौरवाची समजल्या ...
केडगाव : खडकी (ता. नगर) येथील जवान किसन भिवसेन कोठुळे यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) मध्ये गौरवाची समजल्या जाणाऱ्या डीजी डिस्क या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
किसन कोठुळे याने आपल्या सेवेची सुरुवात केंद्रीय राखीव पोलीस फोर्स (सीआरपीएफ) मधून केली होती. २०१५ साली तो एनडीआरएफमध्ये रुजू झाला. ते सध्या पुणे येथील एनडीआरएफच्या पाचव्या तुकडीमध्ये सेवेत आहेत. गुजरात, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील आपत्ती वेळी त्याने आणि त्यांच्या तुकडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०१९-२० मध्ये आशियातील सर्व देशांच्या एनडीआरएफच्या जवानांचा संयुक्त सराव झाला होता. त्यावेळी किसन कोठुळेने आपले कौशल्य दाखविले होते. त्याबद्दल डीजी डिस्कने सन्मानित करण्यात आले. एनडीआरएफच्या पाचव्या तुकडीचे कामांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
--
०३ खडकी