श्रमदान करून बांधली संसाराची गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:16 PM2018-04-19T13:16:50+5:302018-04-19T13:17:09+5:30
लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झाले. वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कर्जत : लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झाले. वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेशरी गावात पाणी फौंडेशनव्दारा काम सुरु आहे. या कामाअंतर्गत सोलापूरच्या तरुण- तरुणीने श्रमदान करत विवाहबध्द होण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. टाकळी खंडेश्वरी गावात आज दुपारी १२ वाजता स्थापलिंग डोंगरावर हा साधा विवाहसोहळा संपन्न झाला. येथे सुरू असलेल्या कामावर काम करणारे वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी या पदवीधर युवकांनी आज सकाळपासूनच श्रमदान केले. त्यानंतर दुपारी विवाह सोहळा संपन्न झाला.