कोल्हे यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात मांडला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:52+5:302021-06-16T04:28:52+5:30
कोल्हे म्हणाल्या, सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात ...
कोल्हे म्हणाल्या, सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे. सध्या पावसाने ओढ दिली असून विहिरीच्या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्यासह इतर पिकांची लागवड केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली. परंतु वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहेत. त्याचप्रमाणे वारंवार वीजबिले भरण्याची मागणी करून मनस्ताप देण्याचे काम केले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या मागणीप्रमाणे वीजबिले भरूनही विद्युत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात असून महिनोंमहिने विद्युत रोहित्र देण्यात टाळाटाळ करून अधिकारी विद्युत रोहित्र वाटपात दुजाभाव करीत आहेत.
ब्राम्हणगाव येथील वाकचाैरे डी. पी. गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही, यामुळे महिनाभरापासून येथील नागरिकांसह जनावरेही पाण्यापासून वंचित आहेत. अनेक कुटुंबांच्या घरातील लाईटही बंद असल्याने शेतकरी बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये वीज मंडळ त्यांना दुजाभावाची वागणूक देउन त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ही अन्यायकारक भूमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. विदयुत रोहित्र तातडीने दुरूस्त करून शेतकऱ्यांना न्याय दयावा, अन्यथा वीज वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोल्हे यांनी दिला.
१५ कोल्हे