कोपर्डी खटला आता औरंगाबादहून मुंबई उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:51 IST2019-11-14T22:49:12+5:302019-11-14T22:51:12+5:30
मुंबई उच्च न्यायालयाकडेखटला वर्ग

कोपर्डी खटला आता औरंगाबादहून मुंबई उच्च न्यायालयात
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अहमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल पुष्टी (कन्फर्मेशन) याचिकेवर सुनावणी होऊन खटला मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आता मुंबई उच्च न्यायालयात या बहुप्रतिक्षित खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींवरील फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा सर्वचजण व्यक्त करत आहेत. पीडिता कुटुंबीयांच्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव काम पाहत आहेत.