कोपरगावात १२ अर्ज अवैध, तर ९६३ वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:16+5:302021-01-01T04:15:16+5:30

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत २९ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि. ३० डिसेंबर) ९७५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले ...

In Kopargaon, 12 applications are invalid, while 963 are valid | कोपरगावात १२ अर्ज अवैध, तर ९६३ वैध

कोपरगावात १२ अर्ज अवैध, तर ९६३ वैध

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत २९ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि. ३० डिसेंबर) ९७५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यामध्ये ४६५ पुरुष, तर ५१० महिला उमेदवारांचा समावेश होता. गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये २९ पैकी ११ ग्रामपंचायतींसाठी दाखल केलेले १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, ९६३ अर्ज वैध असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे. यामध्ये अंजनापूर १, सांगवी भुसार १, वेळापूर १, जेऊर पाटोदा १, अंचलगाव १, रवंदे १, देर्डे चांदवड १, मढी बुद्रुक १, येसगाव २, टाकळी १, जेऊर कुंभारी १ या ११ ग्रामपंचायतींसाठी दाखल केलेले १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

Web Title: In Kopargaon, 12 applications are invalid, while 963 are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.