कोपरगावमध्ये मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत
By Admin | Published: July 4, 2017 02:03 PM2017-07-04T14:03:15+5:302017-07-04T14:03:15+5:30
शहरात राहणा-या एका वीस वर्र्षीय मतीमंद तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
कोपरगावमध्ये मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरात राहणा-या एका वीस वर्र्षीय मतीमंद तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे (रा. माधवनगर,खड्डा गल्ली,गांधीनगर)यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. त्यामुळे गांधीनगर भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी की, रवींद्र मोरे याने हा सोमवार ( ३ जुलै २०१७) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतीमंद मुलीस बळजबरीने घेवून गेला. रात्रभर अत्याचार करून मंगळवारी सकाळच्या ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या परिसरात आणुन सोडले. पिडीत मुलीने रात्रभर झालेला सर्व प्रकार आपल्या आईला हातवारे करून सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीस अटक केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.