कोपरगावात प्रशासनाचे अधिकारी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:09+5:302021-02-23T04:32:09+5:30
कोपरगाव : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून राज्य सरकारच्यावतीने लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी ...
कोपरगाव : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून राज्य सरकारच्यावतीने लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी कोरोनाचे नियम पाळावे. याविषयी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्या धर्तीवर कोपरगावातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (दि.२२) शहरातील रस्त्यावर उतरून जनजागृती करून नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली.
कोपरगाव बसस्थानक परिसरात जनजागृती करीत असताना एक बस वाहक विनामास्क मिळून आल्याने त्याच्यावर नगरपरिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या पथकात तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह महसूल, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते.
220221\img_20210222_184831-01.jpeg
कोपरगावात सोमवारी (दि. २२) प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरले होते.