कोपरगावात प्रशासनाचे अधिकारी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:03+5:302021-05-09T04:22:03+5:30

कोपरगाव : शहरात महसूल, पोलीस आणि कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी- विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ...

In Kopargaon, administration officials took to the streets | कोपरगावात प्रशासनाचे अधिकारी उतरले रस्त्यावर

कोपरगावात प्रशासनाचे अधिकारी उतरले रस्त्यावर

कोपरगाव : शहरात महसूल, पोलीस आणि कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी- विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शनिवारी ( दि.८ ) सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते.

यामध्ये तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, महसूलचे जयवंत भांगरे, शहर पोलीस स्टेशनचे राम खारतोडे, बाबासाहेब कोरेकर, सुरज अग्रवाल, प्रकाश नवाळी, संभाजी शिंदे, राजेंद्र कांबळे, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यासह पोलीस स्टेशनचे कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कोपरगाव शहर व ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक शासनाने दिलेल्या निर्धारित वेळेत बाहेर पडतात. अशावेळी अनेक खरेदी विक्री केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असते. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरत शहरात ठिकठिकाणी संयुक्तपणे भेटी दिल्या आहेत. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दुचाकीवर एकापेक्षा जास्त प्रवास करणारे, कोरोना निर्मूलनासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच नियमितपणे मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: In Kopargaon, administration officials took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.