कोपरगाव शहरात प्रवेशाच्या रस्त्याला भगदाड ! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:21+5:302021-08-23T04:23:21+5:30
कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी शहराच्या पूर्वेला असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून यावे लागते. हा रस्ता मोहिनीराज नगर परिसराच्या नदीकाठाजवळून येतो. ...
कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी शहराच्या पूर्वेला असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून यावे लागते. हा रस्ता मोहिनीराज नगर परिसराच्या नदीकाठाजवळून येतो. हा रस्ता एकदमच नदीकाठी असल्याने गोदावरी नदीच्या थडीला लांब भिंत बांधलेली आहे. सद्यस्थितीत पाऊस जोरात सुरु आहे. मोहिनीराज नगर परिसरातून येणारे पावसाचे पाणी या ठिकाणातून नदीपात्रात वाहत जाते आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर भगदाड मोठे होऊन नदीच्या बाजूची भिंत कोसळून रस्त्याचा सर्व भराव वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
.........
या भगदाडासंदर्भात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हे भगदाड युद्धपातळीवर बुजविले नाही तर नदीपात्रालगतची भिंत कोसळून सर्व भराव वाहून जात दळणवळणाचा रस्ता बंद होऊ शकतो.
- आदिनाथ ढाकणे, अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठान, कोपरगाव
.......
फोटो आहे
गोदावरी नदीकाठी असलेल्या रस्त्याला भगदाड पडले आहे.
...
210821\32431659-img-20210821-wa0019.jpg
फोटो२१ - रस्ता भगदाड - कोपरगाव