कोपरगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी; भाजपच्या स्रेहलता कोल्हे पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:33 PM2019-10-24T16:33:39+5:302019-10-24T16:34:53+5:30
कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे ८४५ मतांनी विजयी त्यांनी भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव केला.
कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे ८४५ मतांनी विजयी त्यांनी भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव केला.
गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुस-या फेरीअखेर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना ८७५८९ मते मिळाली. काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आहेत. तर आमदार स्नेहलता कोल्हे यांना ८६७१४ मते मिळाली. अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांना १५३८२ तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना ३४३२ मते पडली. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. सुरूवातीपासून काळे-कोल्हे यांच्यात फेरीगणीक मतांच्या आघाडीत मागे पुढे होत होती. शेवटी काळे यांनी ८४५ मतांची आघाडी घेत विजय मिळविला.
भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दुस-यांदा रिंगणात होत्या. २०१४ मध्ये पहिल्यांदा त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव केला होता. माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा आहेत. काँग्रेसकडून शंकरराव कोल्हे यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.