कोपरगाव नगरपालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:26 PM2018-01-04T15:26:09+5:302018-01-04T15:27:03+5:30

अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Kopargaon municipality has a broach of Prahar Apang Kranti Sanghatana | कोपरगाव नगरपालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेचा घंटानाद

कोपरगाव नगरपालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेचा घंटानाद

कोपरगाव : अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
२०११ ते २०१७ पर्यंत अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बॅक खात्यात वर्ग करावा, जन्म-मृत्यू नोंदी प्रमाणे अपंगांची आॅनलाईन नोंदणी करण्यात यावी, अपंगांना व्यवसायासाठी शासकीय जागा, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा, अपंग नोकरभरतीचा अनुशेष भरावा, पालिकेचे ३ टक्के गाळे अपंगांना वाटप करावे, घरपट्टी, नळपट्टी, गाळा भाडे व व्यवसाय कर ५० टक्के माफ करावे या मागण्यांसाठी गुरूवारी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनास नगरसेवक हाजी महेमूद सय्यद, सत्येन मुंदडा, जनार्दन कदम व संजय पवार यांनी पाठींबा दिला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब लांडे, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे, संदीप कवडे, मुकूंद काळे, परेश गोसावी, स्वप्नील कडू, आदित्य निकुंभ आदी उपस्थित होते.

Web Title: Kopargaon municipality has a broach of Prahar Apang Kranti Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.