कोपरगावच्या संजीवनी अभियांत्रिकीच्या कारचा देशात दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:12 PM2018-05-07T14:12:56+5:302018-05-07T14:13:32+5:30
भोपाळ येथील आर. के. डी. एफ. विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिकल कारने दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव : भोपाळ येथील आर. के. डी. एफ. विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिकल कारने दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी प्रथम नवी दिल्ली येथील क्रेडिबल फ्युचर कंपनीच्या मार्गदर्शक संकल्पनेनुसार व्हीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे इलेक्ट्रिक कार डिझाईनचे सादरीकरण केले. या फेरीत विद्यार्थी उत्तीर्ण होवून त्यांना कार डिझाईनची परवानगी मिळाली. विद्यार्थ्यांनी कंपनीला दिलेल्या सादरीकरणाला अनुसरून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये ही कार तयार केली. या कारचे वजन फक्त १०० किलोग्रॅम असून ४८ व्होल्ट, ७० अॅम्पिअर अवर क्षमतेची लिथीयम आर्यन बॅटरी वापरण्यात आली आहे. बॅटरीचा वीज पुरवठा १ किलोवॅट बीएलडीसी मोटरला देवून यांत्रिकी उर्जा निर्माण केली जाते. या स्पर्धेत भारतातील आयआयटी, एनआयटी, विद्यापीठांसह अभियांत्रिकी महाविद्यालये अशा एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९ मुलींचा सहभाग होता. शुभम रोहमारे याने कॅप्टन व अनघा थोरात हिने व्हाईस कॅप्टन म्हणून काम पाहीले. सुहास बोठे व विशाल गायकवाड यांनी रायडर, ऋशिकेष पुणे, सोमेष्वर गरूड यांनी ट्रेझररचे काम पाहिले. पल्लवी सांगळे, स्नेहल पाटील, स्नेहल मोहिते, पूजा येवले, नीदा शेख, जुनेद तांबोळी, सौरभ चव्हाण, सुमीत कावडे, प्रसाद गायकवाड, मनन ठोळे, सौरव कुकर यांनी टीममध्ये मोलाचे योगदान दिले. प्रा. भऊरकर यांनी उत्तम मार्गदर्शकाचे ५ हजारांचे रोख बक्षिस मिळाले आहे. या कारसाठी एकूण ६२ हजार ५००रुपयांची रोख बक्षिसे संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.