कोतवाल, कित्तुर, अवस्थी प्रथम

By Admin | Published: September 13, 2014 10:33 PM2014-09-13T22:33:13+5:302024-03-18T16:40:25+5:30

संगमनेर : देशभरातून आलेल्या शालेय जलतरणपटुंनी पश्चिम विभागीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला.

Kotwal, Kittur, Awasthi First | कोतवाल, कित्तुर, अवस्थी प्रथम

कोतवाल, कित्तुर, अवस्थी प्रथम

संगमनेर : देशभरातून आलेल्या शालेय जलतरणपटुंनी पश्चिम विभागीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. ‘ध्रुव’ अ‍ॅकॅडमीत सी.बी.एस.ई. पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटांत झालेल्या जलतरण प्रकारात सिध्दी कोतवाल, अनुज कित्तुर व समिधा अवस्थी यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.
१६ वर्षाखालील मुलींच्या २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात नाशिक सिंम्बॉयसिस स्कूलच्या सिध्दी कोतवाल हिला प्रथम क्रमांक मिळाला. नागपूर मॉडर्न स्कूलच्या कृतिका जैन व पुणे इंदिरा नॅशनल स्कूलच्या साक्षी दिवाणने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपुरच्या सेंटर पॉर्इंट स्कूलच्या समिधा अवस्थीने जलद हालचाल करीत २०० मीटर प्रकारात प्रथम क्रमांकावर बाजी मारली. दयानंद स्कूल, बिकानेरच्या नैऋती व्यासने द्वितीय, तर स्वामी नारायण स्कूल, नागपुरच्या दिया अमेघेने तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात सिंम्बॉयसिस, नाशिकचा अनुज कित्तुर विजयी ठरला. शिशूकुंज पब्लिक स्कूल, इंदोरच्या अद्वैत पागेने द्वितीय, तर भारतीय विद्याश्रम, जयपूरच्या तनिष नयासारने तृतीय क्रमांक मिळविला. स्पोर्टर्स अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाचे उपसंचालक विरेंद्र भांडारकर, सी.बी.एस.ई.चे कॅप्टन मनोज झा, मुख्य पंच शंकर मनगुंटी, राजेश मालपाणी, अनुराधा मालपाणी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Kotwal, Kittur, Awasthi First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.