नगर तालुक्यात ४ ठिकाणी ४५० रुग्णांचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:27+5:302021-04-14T04:18:27+5:30

नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात जेऊर, ...

Kovid center of 450 patients at 4 places in Nagar taluka | नगर तालुक्यात ४ ठिकाणी ४५० रुग्णांचे कोविड सेंटर

नगर तालुक्यात ४ ठिकाणी ४५० रुग्णांचे कोविड सेंटर

नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात जेऊर, बुऱ्हाणनगर, अरणगाव, निंबळक व चिचोंडी पाटील येथे कोविड सेंटर सुरू आहेत. एकत्रित सर्व मिळून ४५० रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशासनाद्वारे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, ग्रामसेवक व आशासेविका यांच्या समावेशात ग्रामसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामसमितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३६ पर्यवेक्षक नेमलेले आहेत. त्या सर्वांवर नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अभिजीत बारवकर काम पाहत आहेत. कंटेन्मेंट झोनचे व्यवस्थापन व ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण गटविकास अधिकारी घाडगे करीत आहेत.

कोविड सेंटर सुरू असलेल्या ठिकाणच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी उमेश पाटील प्रत्यक्ष भेटीद्वारे करीत आहेत. कंटेन्मेंट झोनवर तहसीलदार लक्ष ठेवून आहेत. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत.

.............

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून उपचार करावा. नागरिकांनी न घाबरता कोरोनाला धैर्याने सामोरे जावे व सर्व नागरिकांनी करण्याची खबरदारी घ्यावी. -उमेश पाटील, तहसीलदार

Web Title: Kovid center of 450 patients at 4 places in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.