शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:09 PM2020-07-26T13:09:24+5:302020-07-26T13:09:56+5:30

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Kovid Center to be set up at Sai Sansthan Hospital in Shirdi, Health Minister Rajesh Tope testified to Lokmat | शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

प्रमोद आहेर  

 शिर्डी : साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात तातडीने कोवीड हॉस्पीटल सुरू करण्याच्या सूचना आपण अहमदनगर जिल्हाधिकाºयांना तत्काळ देणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सध्या शिर्डीतील कोवीड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतात़ सध्या तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोनशेचा टप्पा पुर्ण केला आहे तर शिर्डीही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे़ येथील सेंटरमधून लक्षणे असलेल्या व्यक्तींना लोणी किंवा नगरला पाठवण्यात येते़ मात्र सध्या ही दोन्ही ठिकाणे हाऊसफुल आहेत़ नगरला रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे़ खासगी रूग्णालयात पैसे मोजूनही हातापाया पडावे लागत आहे़ तेथील उपचार परवडणारे नाहीत़त्यामुळे शिर्डीतील कोवीड सेंटरचे रूपांतर आता कोवीड हॉस्पीटलमध्ये करण्याची सामाजिक गरज निर्माण झाली.
साईसंस्थानच्या दोन्ही रूग्णालयापैकी एका ठिकाणी, यातील एखाद्या विभागात किंवा द्वारावती, साईआश्रम येथे हॉस्पीटल सुरू करणे शक्य आह. साईसंस्थानकडे पुरसे व्हेंटीलेटर व आॅक्सिजनची व्यवस्था आहे. संस्थानकडे डॉक्टरांची व नर्सेसची कमतरता आहे़ संस्थांनने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली व शासनाने परिसरातील शासकीय किंवा खाजगी डॉक्टरांची सेवा घेवून हे हॉस्पीटल सुरू करता येवू शकते़ यामुळे तालुका व परिसरातील रूग्णांना पुढील उपचारासाठी वणवण करावी लागणार नाही.

रूग्णसेवा हीच साईबाबांची प्रथम शिकवण आहे, प्रसंगी बाबांनी रूग्णांचे आजार स्वत:वर घेवुन रूग्णांना व्याधी मुक्त केल्याची उदाहरणे आहे.यामुळे अशा महामारीच्या काळात साईबाबांचा वारसा जपणाºया संस्थानला ही रूग्णसेवेची मोठी संधी आहे़ यासाठी भाविकही मदतीला नक्की पुढे येतील.
 
Web Title: Kovid Center to be set up at Sai Sansthan Hospital in Shirdi, Health Minister Rajesh Tope testified to Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.