अकोलेत शिक्षक उभे करणार कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:31+5:302021-04-26T04:18:31+5:30

पंचायत समिती सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर, मधुकर नवले, डॉ. अजित नवले, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, संपत ...

Kovid Center to set up teachers in Akole | अकोलेत शिक्षक उभे करणार कोविड सेंटर

अकोलेत शिक्षक उभे करणार कोविड सेंटर

पंचायत समिती सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर, मधुकर नवले, डॉ. अजित नवले, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, संपत नाईकवाडी, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभीरे यांच्या समवेत प्राथमिक शिक्षक समन्वय समिती व माध्यमिक शिक्षक समन्वय समिती सहविचार सभा रविवारी पार पडली. चर्चेतून सकारात्मक निर्णय पुढे आला. ऑक्सिजनयुक्त ५० बेडचे कोविड सेंटर, सुगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीत उभे करण्याचे ठरले. या कोविड सेंटरला मदत करू तसेच सहकारी संस्था मदत करतील, अशी ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी दिली.

प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक मित्र ग्रुपवर आतापर्यंत ६५५ शिक्षकांनी मदत निधी जमा केला आहे. अंदाजे पाच लक्ष रुपये निधी संकलन झाले असून यात वाढ होत आहे. माध्यमिक शिक्षकांनी एका दिवसात १ लाख ४० हजार रुपये निधी जमा केला यात आतपर्यंत १५२ माध्यमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा मानस असल्याचे अण्णासाहेब आभाळे व धनंजय भांगरे यांनी सांगितले.

राजेंद्र सदगीर, अनिल मोहिते, अण्णा आभाळे, भाऊसाहेब चासकर, प्रतीक नेटके, सुभाष बगनर, गोरक्ष देशमुख, सुनील बनोटे, गंगाराम गोडे, सतीश जाधव आदी शिक्षकांनी यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Kovid Center to set up teachers in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.