विवेकानंद नर्सिंग होममध्ये कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:39+5:302021-05-05T04:33:39+5:30
सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील रुग्णांची तालुक्यामध्ये उपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून श्री विवेकानंद नर्सिंग होम व कै. ...
सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील रुग्णांची तालुक्यामध्ये उपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून श्री विवेकानंद नर्सिंग होम व कै. डॉ. संजय महाडिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे सुमारे ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या या सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्याचा मानस असल्याची माहिती डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांनी दिली.
या कोविड सेंटरमध्ये १५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. डॉ. सूरज महाडिक, डॉ. विशाल आंबरे हे या कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करणार आहेत. त्याचबरोबर इतरही स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील रुग्णांनी फायदा घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अंबादास पारखे, विवेकानंद नर्सिंग होमचे अधीक्षक डॉ. बाळासाहेब पागिरे, प्राचार्य डॉक्टर विलास कड यांनी केले आहे.