नागरिकांकडून कोविड नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:29+5:302021-04-10T04:21:29+5:30
डॉ. एन. गिरीश राव आणि डॉ. सुशील गुरिया या दोन सदस्यांचे केंद्रीय पथक शुक्रवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर ...
डॉ. एन. गिरीश राव आणि डॉ. सुशील गुरिया या दोन सदस्यांचे केंद्रीय पथक शुक्रवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर शहरात दाखल झाले. हे पथक तीन दिवस जिल्ह्यात राहणार असून विविध भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. डॉ. राव हे बंगलूरू येथील एनआयएमएचए संस्थेत साथरोगशास्त्रज्ञ आहेत तर डॉ. गुरिया हे दिल्ली येथील एसजेएस संस्थेत वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्हे, उज्ज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.