कोरेगाव येथे कृषिकन्येचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:14+5:302021-08-01T04:21:14+5:30
कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अकॅडमीच्या ...
कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अकॅडमीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी (ता. मावळ, जि.पुणे) येथील विद्यार्थिनी कृषिकन्या सुषमा उद्धव मुरकुटे हिने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. बी. व्ही. खोब्रागडे, उपप्राचार्य प्रा. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी बांगर, सर्व विषयशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मृदा परीक्षणासाठी शास्त्रीय पद्धतीने माती नमुना घेणे, बी. प्रक्रिया, चाराप्रक्रिया, जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ती मार्गदर्शन करत आहे. यावेळी शेतकरी नीळकंठ मुरकुटे, नवनाथ नवले, किसन कोखरे, रंगनाथ दोलताडे आदी उपस्थित होते.