कुकडी कालवा पुन्हा फुटला

By Admin | Published: April 29, 2016 11:24 PM2016-04-29T23:24:24+5:302016-04-29T23:31:09+5:30

कर्जत : तालुक्यातील आळसुंदा शिवारात कुकडीचा मुख्य कालवा फुटला. यामुळे करमाळा तालुक्यातील वीट तलावात जाणारे पाणी बंद झाले आहे.

Kukadi canal again split up | कुकडी कालवा पुन्हा फुटला

कुकडी कालवा पुन्हा फुटला

कर्जत : तालुक्यातील आळसुंदा शिवारात कुकडीचा मुख्य कालवा फुटला. यामुळे करमाळा तालुक्यातील वीट तलावात जाणारे पाणी बंद झाले आहे. कालवा फुटण्याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
करमाळा तालुक्यातील वीट येथील तलावात पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुरू होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास साळुंके वस्तीजवळ कुकडीचा मुख्य कालवा फुटला.
योगायोग असा की, ज्या ठिकाणी कालवा फुटला, तेथे ओढा आहे. कुकडीचे पाणी या ओढ्यातून आंबीजळगावकडे जाणाऱ्या नदीला जाऊन मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले नाही. नदीवरील दोन बंधारे भरले. या घटनेची माहिती समजताच कुकडीचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी येथील पाणी बंद केले. ते सध्या चिलवडी चारी, पाटेवाडी, गलांडवाडी येथे वळविण्यात आले आहे. आळसुंदा येथे फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी उशिरा सुरू झाले. शनिवारी या चारीचे काम पूर्ण होईल व लगेच याद्वारे आवर्तन सोडण्यात येईल.
(तालुका प्रतिनिधी)
आळसुंदा येथे कालवा का फुटला, याचे कारण समजू शकले नाही. बहुतेक उंदरांनी छिद्र पाडले असावे व यामुळे हा कालवा फुटला असावा, अशी शक्यता आहे.
-जी. एम. जगताप, उपअभियंता, कुकडी विभाग, कर्जत.

Web Title: Kukadi canal again split up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.