‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:36+5:302021-02-27T04:27:36+5:30
२६ प्रवरासंगम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील विद्यार्थ्यांनी मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून मराठी राजभाषा दिन साजरा ...
२६ प्रवरासंगम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील विद्यार्थ्यांनी मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून मराठी राजभाषा दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, ’ असा आशयाचा संदेश देत मराठी भाषेचा गौरव केला. या उपक्रमात साई डावखर, गौरी पांडव, साई चिंधे, स्वानंदी ठाणगे, चैतन्य कोरडे, आदिती आगळे, कार्तिक आगळे, प्रिया सुडके, सहर्ष चव्हाण, प्रज्ञा पांडव, फरहान पिंजारी, दिव्या शेलार, यश यादव, श्रावणी मते, मयूर काळे, जानव्ही शेलार आदी विद्यार्थी सहभागी झाले. वर्गशिक्षिका शीतल झरेकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करत हा उपक्रम घेण्यात आला.