श्रीगोंद्यात अडकलेले मजूर निघाले मायभूमीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 03:59 PM2020-05-06T15:59:52+5:302020-05-06T16:00:30+5:30
श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मजुरांना सोडविण्यासाठी काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलाने चार बसेसची व्यवस्था केली आहे, अशी माहिती परिक्रमा संकुलचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली. तर भारतीय काँग्रेस पक्षाने परप्रांतीय मजुरांची रेल्वेची तिकिटे काढून व्यवस्था केली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली. श्रीगोंदा येथील चंद्रकांत चौधरी यांनी सर्व मजुरांसाठी बसमध्ये नाष्टा म्हणून भेळीची व्यवस्था केली आहे.
श्रीगोंद्यात बाहेरील राज्यातील १ हजार ८६२ राज्याबाहेरील ५ हजार १२ मजूर आहेत. सर्व मजुरांना रेल्वे आणि बस उपलब्धतेनुसार त्यांच्या जिल्ह्यात सोडविण्यात येईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. मजुरांना गाडीत बसण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, असे श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी सांगितले.