आगीत पाऊण लाखांचे नुकसान : पाचेगावातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 07:28 PM2019-02-22T19:28:58+5:302019-02-22T19:29:33+5:30
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे छबूबाई दौलत मोरे (वय ८०) यांच्या राहत्या छप्पराला लागलेल्या आगीत कागदपत्रांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे छबूबाई दौलत मोरे (वय ८०) यांच्या राहत्या छप्पराला लागलेल्या आगीत कागदपत्रांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
बुधवारी लागलेल्या या आगीत जवळपास पाऊण लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. छप्पराला लागलेली आग कशामुळे लागली? याचे कारण समजू शकले नाही. भरदुपारी लागलेल्या आगीच्यावेळी शेजारीपाजारी कोणीही नव्हते. त्यामुळे संपूर्ण छप्पर आगीत खाक झाले. छप्पराला लागलेल्या आगीत पैशांसह धान्य, कागदपत्रे, कपडे, टीव्ही आदी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.