ऑक्सिजनचा तुटवडा भासू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:23+5:302021-04-05T04:19:23+5:30
यावेळी उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार मुकेश कांबळे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, पोलीस ...
यावेळी उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार मुकेश कांबळे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, गटविकास अधिकारी डी.डी. सोनकुसळे, नोडल ॲफिसर डाॅ. श्याम शेटे आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास आठ- दहा दिवस लागतात, ही गंभीर बाब आहे. तालुका आरोग्य विभागाने सजग व्हावे, पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष कारवाईवर भर द्यावा; अन्यथा गय केली जाणार नाही. जिल्ह्यात सध्या ९ हजार ३३८ क्रियाशील कोरोना रुग्ण आहेत. कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत सक्तीचे होमक्वारंटाइन व हातावर शिक्का मारला जाईल. कोरोना चाचणी अहवाल विलंब यात सुधारणा केली जाईल. ब्राह्मणवाडा, कोतूळ भागातून आलो, तिकडे नागरिक सजग नाहीत, गप्पा करणाऱ्यांचे घोळके दिसतात. मास्कचा वापर दिसत नाही. कारवाई वाढवली पाहिजे, वारंवार कारवाई केली, तर फरक पडेल. महसूल, पंचायत समिती व नगरपंचायत कारवाई करते, तसेच पोलिसांनी कारवाईचे प्रमाण वाढवावे. नियम न पाळणारी दुकाने सक्तीने सात दिवस बंद ठेवावीत. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. ऑक्सिजन, औषधे, कोविड लस कमी पडणार नाही, असे स्पष्ट करत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. नंतर खानापूर येथील सरकारी कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली.