रेमडेसिविरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:01+5:302021-04-22T04:20:01+5:30
श्रीरामपूर : शहरातील कोरोना उपचार केंद्रांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाहीत. त्याबाबत प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ...
श्रीरामपूर : शहरातील कोरोना उपचार केंद्रांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाहीत. त्याबाबत प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी यांनी केली आहे.
शहरात प्रशासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर मिळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. मेडिकल दुकानातही ते उपलब्ध नाही. प्रशासन मात्र पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन देते. त्यामुळे गडबड कुठे होत आहे? असा प्रश्न सेठी यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णालय चालक मागणीपेक्षा कमी इंजेक्शन मिळत असल्याचे सांगत आहेत. मात्र, काळ्या बाजारात २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीत ते सर्रास विकले जात आहेत. रुग्णाच्या कुटुंबीयांना मात्र ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुहेरी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, अशी खंत सेठी यांनी व्यक्त केली.