श्रीक्षेत्र मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:20 PM2018-03-05T19:20:59+5:302018-03-05T19:21:16+5:30
तिसगाव : आदेश चैतन्य कानिफनाथ महाराज की जय.. हर हर महादेव... अलख निरंजन.... अशा नाथपरंपरेचा जयघोषात भटक्यांची पंढरी समजल्या ...
तिसगाव : आदेश चैतन्य कानिफनाथ महाराज की जय.. हर हर महादेव... अलख निरंजन.... अशा नाथपरंपरेचा जयघोषात भटक्यांची पंढरी समजल्या जाणा-या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सव उत्साहात सुरू आहे. कानिफनाथांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी उसळली असून रंगपंचमीच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
नाथस्तुतींचे सामूहिक आरती सोहळे राज्याच्या विविध भागातून श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथे दाखल झालेल्या निवासी अस्तन्यांवर सुरु असल्याने रंगपंचमीच्या जल्लोषाला भरते आले आहे. योगी तपस्व्यांची भूमी मानले गेलेल्या हिमालयात चैतन्य कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. विहित अवतार कालखंडातील कार्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या पावन तिथीस मढी येथे संजीवन समाधी घेतली असल्याची वंदता आहे. खाजगी वाहने पार्कींग अस्तन्याच्या राहुट्याने गाव परिसर गजबजून गेला आहे. विश्वस्त मंडळाने यावर्षी १३ ते १६ मार्च दरम्यान चार दिवस नाथांचे संजीवन समाधीचे मुक्तद्वार दर्शनासाठी आधीच घोषित केल्याने बहुतांश भाविकांना ते सुकर ठरणार आहे. एका दिवसाची गर्दी यामुळे विखुरली जाऊन सर्वच पातळीवरील सुरक्षा यामुळे होईल. होळी, रंगपंचमी, फुलोरबाग, कावडी जलाभिषेक, पाडवा अशा विविध टप्यात मढीची महायात्रा पार पडते. यात्रेतील मिठाई रेवडी इतर खाद्यपदार्थ विक्रेते, मनोरंजनाचे तमाशे, खेळणी, रहाटपाळणे यांच्या आर्थिक उलाढालीस सुद्धा बळकटी येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वतीने सोमवारी जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कलाभूषण रघुवीर खेडकर यांना सोमवारी सकाळी देवस्थानचे सभागृहात ग्रामस्थ विश्वस्थ मंडळाचे वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. मढी गडाच्या पूर्व, पश्चिम व उत्तरेच्या प्रवेशद्वारांवरील पाय-यांवर नारळ फोडण्याऐवजी तो अर्पण करावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे. चोख पोलीस बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे.