घरफोडी करून चोरले लाखाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:15 AM2021-05-03T04:15:32+5:302021-05-03T04:15:32+5:30

...... चोरट्यांनी लांबविली वृद्ध व्यक्तीची अंगठी अहमदनगर : दोघा चोरट्यांनी बोलण्याचा बहाना करून एका वृद्ध व्यक्तीच्या हातातील दीड तोळे ...

Lakhs of jewelery stolen by burglars | घरफोडी करून चोरले लाखाचे दागिने

घरफोडी करून चोरले लाखाचे दागिने

......

चोरट्यांनी लांबविली वृद्ध व्यक्तीची अंगठी

अहमदनगर : दोघा चोरट्यांनी बोलण्याचा बहाना करून एका वृद्ध व्यक्तीच्या हातातील दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली. शहरातील सारस कॉलनी येथे १ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बापू नारायण नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार शिंदे पुढील तपास करत आहेत.

........

मोटारसायकल चोरली

अहमदनगर : बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळा परिसरातील अमृतवेल बिल्डिंग येथून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली. १ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात उषा नितीन मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भामरे पुढील तपास करत आहेत.

........

शेळ्या चोरल्या

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या व पाच हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. १ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सचिन विलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार गवळी हे पुढील तपास करत आहेत.

.........

Web Title: Lakhs of jewelery stolen by burglars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.