शंभर टक्के मतदान करणा-या गावाला मिळणार लाखाचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:00 PM2019-09-28T12:00:16+5:302019-09-28T12:01:23+5:30
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.
अहमदनगर: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील गावा-गावात शंभर टक्के मतदान होण्यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.
कुठल्याही निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला तर योग्य उमेदवार निवडला जात नाही. कमी मतदान हे लोकशाहीला मारक असून, शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे़ मतदानासारख्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर युवकांनी मतदार जागृतीसाठी करुन शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बोरुडे यांनी केले आहे़