पारनेर तहसीलजवळील अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:30+5:302020-12-31T04:21:30+5:30

पारनेर : तहसील कार्यालय परिसरातील टपऱ्या व अतिक्रमणे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या धडक कारवाईमुळे मंगळवारी रात्री जमीनदोस्त करण्यात आली. ...

Land encroachments near Parner tehsil | पारनेर तहसीलजवळील अतिक्रमणे जमीनदोस्त

पारनेर तहसीलजवळील अतिक्रमणे जमीनदोस्त

पारनेर : तहसील कार्यालय परिसरातील टपऱ्या व अतिक्रमणे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या धडक कारवाईमुळे मंगळवारी रात्री जमीनदोस्त करण्यात आली.

पारनेर तहसील कार्यालयाच्या गेटजवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्यांना अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी रात्री सात वाजता तहसील कार्यालयाजवळील अतिक्रमणे काढण्यासाठी सूचना केल्या. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने अनेक टपऱ्या, बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

यामध्ये हॉटेल, झेरॉक्स दुकान, दुकानांपुढील पत्रा शेड काढण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पाेलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, बालाजी पद्मने, नायब तहसीलदार माळवे, मंडळाधिकारी सचिन पोटे, तलाठी दिलीप लांडे, भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.

---

पक्की बांधकामे असणाऱ्यांचे धाबे दणाणले..

तहसीलदार ज्योती देवरे यांनी धडाकेबाज अतिक्रमण मोहीम सुरू केल्यामुळे पारनेर तहसील ते सुपा रस्त्यावरील पक्की बांधकामे असणाऱ्या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. अनेक अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Land encroachments near Parner tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.