बुलेट ट्रेनसाठी पुन्हा जमीन अधिग्रहण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:30+5:302021-03-14T04:19:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात गेल्या दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जमिनी अधिकृत झाल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात गेल्या दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जमिनी अधिकृत झाल्या होत्या. शिर्डी-नाशिक रोडच्या जमिनीही अधिग्रहित करुन तेथे इंदोर महामार्गाचे काम चालू झाले. आता पुन्हा एकदा बुलेट ट्रेन बाबत याच परिसरात जमिनी अधिग्रहित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
याबाबत शुक्रवारी चांदेकसारे येथे बुलेट ट्रेनबाबत अधिकाऱ्यांसोबत चांदेकसारे ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली. यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच पूनम खरात, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, ॲड. ज्ञानेश्वर होन, अशोक होन, शरद होन, भिमाजी होन, दिलीप होन, फिरोज शेख, रवि खरात आदी उपस्थित होते.
....
अधिकाऱ्यांनी दिली प्राथमिक माहिती
बुलेट ट्रेनचे अधिकारी शाम चौगुले, सर्वेक्षण अधिकारी तायडे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन बुलेट ट्रेन संदर्भात प्राथमिक माहिती दिली. बुलेट ट्रेनचे
मोजमाप- एकूण लांबी ७५३ किलोमीटर रुंदी ८० फूट तसेच उंची ३० ते ५० फूट असल्याचे त्यांनी सांगितले.
....
आम्हाला अधिकृत माहिती द्या
माजी सरपंच केशवराव होन यांनी यासंदर्भात आपली माहिती देऊ नका. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नका. आधीच चांदेकसारे परिसरातील बरीच जमीन इतरही महामार्गासाठी अधिग्रहित झालेली आहे. बाधित होणाऱ्या शेतकऱ्याचे सर्व्हे नंबर, नावे, मॅप नकाशे घेऊन आपण अधिकृत माहिती आम्हाला द्यावी. पुढील होणाऱ्या बैठकीत या संदर्भात सर्व माहिती घेऊन या असे त्यांनी सांगितले.
......
हवाई सर्व्हे झाला होता
समृद्धी महामार्गाच्या कोणत्या बाजूने ही बुलेट ट्रेन जाणार आहे. या बुलेट ट्रेनच्या अधिग्रहणात कोणते शेतकरी बाधित होणार आहेत, हे मात्र येणाऱ्या बैठकीतच समजेल. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या परिसरात हवाई सर्व्हे झालेला होता. याची कुणकुण शेतकऱ्यांना लागली होती. मात्र हा सर्व्हे कशाचा आहे हे शेतकऱ्यांच्या माहीत नव्हते. शनिवारी या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आता चांदेकसारे परिसरातून बुलेट ट्रेन केली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
....