सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा सर्वात मोठा पुतळा उभारणार-गोपीचंद पडळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:41 AM2020-05-31T11:41:21+5:302020-05-31T11:41:31+5:30
चौंडी (जि. अहमदनगर) : देशातील विद्यापीठांमध्ये सध्या विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि अहिल्यादेवींचा सर्वात उंचीचा पुतळा सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत, असे धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.
चौंडी (जि. अहमदनगर) : देशातील विद्यापीठांमध्ये सध्या विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि अहिल्यादेवींचा सर्वात उंचीचा पुतळा सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत, असे धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जन्मस्थळी पडळकर यांनी आज सकाळी अभिवादन केले. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना पडळकर म्हणाले, मागच्या सरकारने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असे नाव दिले आहे. आता या विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प चौंडी या त्यांच्याच जन्मस्थळामधून करीत आहे. चांगल्या दिवशी चांगला संकल्प करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे तमाम धनगर समाजाच्यावतीने हा संकल्प केला जात आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त काही तरी संकल्प केला पाहिजे, असे मनात होते. देशभरामध्ये सातशेपेंक्षा जास्त विद्यापीठ आहेत. प्रत्येक विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि सर्वात मोठा अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत. सोलापूर विद्यापीठामध्ये दोन प्रशासकीय इमारती आहेत. एक जुनी इमारत ३२ एकरात आहे. आता ४३२ एकरामध्ये नवीन इमारतीचे काम सुरू आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. अनेक संकल्प त्यांच्याकडे व्यक्त केले आहेत, असेही पडळकर म्हणाले. अखिल महाराष्ट्राच्या,धनगर समाजाच्यावतीने केलेला हा संकल्र लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशामध्ये लॉकडाऊन आहे. अहिल्यादेवींचा जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला आहे. चौंडीचा परिसर माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यामुळे देखणा परिसर होऊ शकला. राम शिंदे, महादेव जानकर यांचेही यामध्ये योगदान आहे, असेही पडळकर म्हणाले.