..या गावांची थेट जनतेतून होणारी अखेरची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:48 PM2020-02-26T14:48:45+5:302020-02-26T14:49:37+5:30
थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडीने सदस्यांतून सरपंच निवडीला मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. मात्र नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तत्पूर्वीच जाहीर झाला असून २९ मार्चला येथे मतदान होत आहे. त्यामुळे ही सरपंच निवड जनतेतून होणार आहे. पण ती अखेरची असेल. यापुढील निवडी थेट सदस्यांतून होणार आहेत.
अहमदनगर : थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडीने सदस्यांतून सरपंच निवडीला मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. मात्र नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तत्पूर्वीच जाहीर झाला असून २९ मार्चला येथे मतदान होत आहे. त्यामुळे ही सरपंच निवड जनतेतून होणार आहे. पण ती अखेरची असेल. यापुढील निवडी थेट सदस्यांतून होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. २४) राज्यातील १९ जिल्ह्यांतील १५७० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन गावांचा समावेश आहे. या गावांत सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, राज्य शासनाने थेट सरपंच निवडी रद्द करण्याचा निर्णय बुधवारी अधिवेशनात घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन गावांची थेट सरपंच निवड अखेरची ठरणार आहे. जुलै, आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ते सर्व सरपंच सदस्यांतून असतील, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.