मुळा धरणातून अखेरचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:14 PM2019-06-21T12:14:25+5:302019-06-21T12:15:41+5:30

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरूवारी रात्री दहा वाजता पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले.

The last recurrence of radish dam started | मुळा धरणातून अखेरचे आवर्तन सुरू

मुळा धरणातून अखेरचे आवर्तन सुरू

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरूवारी रात्री दहा वाजता पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले. ३६ तास आवर्तन सुरू राहणार असून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली़
२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून ७०० क्युसेकने पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे़ जून महिन्यामध्ये पावसाने दांडी मारल्याने यंदा धरणात नव्याने पाण्याची आवक झालेली नाही़ त्यामुळे मुळा धरणाची पातळी दररोज खाली जात आहे़ धरणात सध्या ४ हजार ९९९ दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे़ पाण्याची चोरी होऊ नये यासाठी गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होऊ नये म्हणून महावितरणाला विद्युत पुरवठा करण्याचे पत्र देण्यात आले आहे़

Web Title: The last recurrence of radish dam started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.