साडेपाच हजार शेतकऱ्यांना गतवर्षीचा फळबाग विमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:23 IST2021-03-01T04:23:26+5:302021-03-01T04:23:26+5:30
पारनेर : जिल्ह्यातील २०१९-२० चा खरीप व रबी हंगाम (आंबे बहर फळबाग) मंजूर झालेला; परंतु न मिळालेला पीक विमा ...

साडेपाच हजार शेतकऱ्यांना गतवर्षीचा फळबाग विमा मंजूर
पारनेर : जिल्ह्यातील २०१९-२० चा खरीप व रबी हंगाम (आंबे बहर फळबाग) मंजूर झालेला; परंतु न मिळालेला पीक विमा साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी, पारनेरच्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले.
चुकीचे खाते नंबर, सेतू केंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे नावात बदल, इतर तांत्रिक बाबींमुळे पीक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे परत गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात याद्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी फोटोसह बँक पासबुक, त्यावर संपूर्ण खाते नंबर, आयएफएससी कोड, बँच कोडसह पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स आदी कागदपत्रे पारनेर बाजार समितीच्या कार्यालयात जमा करावे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या जिल्हा बँकेेच्या तालुका विकास अधिकारी जमा करावेत, असे आवाहन गायकवाड यांनी केले.