स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सुरू, पाच वाजेपर्यंत करता येणार रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:28 PM2020-07-02T13:28:30+5:302020-07-02T13:31:37+5:30
अहमदनगर : स्वातंत्रसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत आणि आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी रक्तदान शिबिराला सुरवात झाली.
अहमदनगर : स्वातंत्रसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत आणि आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी रक्तदान शिबिराला सुरवात झाली.
या शिबिरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान करता यणार आहे. आनंदऋषीजी ब्लड बँक , आनंदऋषी हॉस्पिटलच्या मागे, माणिकनगर, अहमदनगर येथे हे रक्तदान शिबिर सुरू आहे.
शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमास ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. गणेश कांकरिया, सुनील महानोर, प्रमुख नर्स निसात शेख, अलका मुंदडा यांच्यासह सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी, लोकमत परिवारातील सदस्य व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्ससे पालन करीत रक्तदान शिबिराला सुरवात झाली. स्व. जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरवात झाली.
यावेळी डॉ. कांकरिया म्हणाले, कोरनाच्या काळात रक्तदान हा सुद्धा एक कोरोना योद्धा आहे. कोरोनाच्या काळात इतर रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासते आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतचा हा उपक्रम स्त्युत्य आहे.
सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंग
-कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात येत आहे. सॅनिटायझरची व्यवस्था आहे. यासोबतच फि जिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे.
---
दिवसभर रक्तदान करता येणार
फिजिकल डिस्टन्सचे पालन करता यावे, यासाठी रक्तदान शिबिराची वेळ सायंकाळी पाचपर्यंत ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ््या वेळी येऊन रक्तदान करायचे आहे. लोकमतच्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.