मान्सून उशिरा; पण पाऊस भरपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:09+5:302021-04-14T04:19:09+5:30
सालाबादाप्रमाणे मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या मंदिरात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ह.भ.प. ...
सालाबादाप्रमाणे मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या मंदिरात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ह.भ.प. पंढरीनाथ काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले. मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवत्सरीचे वाचन करताना भाविक भक्तांना बंदी घालण्यात आली आहे. गोदड महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
शेतकरी वर्गासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी मान्सूनचे आगमन थोडे उशिरा होईल; पण भरपूर पाऊस पडेल. एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाडींपासून त्रास होईल. लोकालोकांत कलह वाढेल, रोगराई वाढेल. राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप व रबीची पिके मुबलक प्रमाणात पिकतील. एकंदरीत गोदड महाराज यांच्या संवत्सरीत शेतकऱ्यांसाठी शुभ वर्तमान वर्तविण्यात आले आहे, तर आश्विन व कार्तिक महिन्यांतं देशात अराजकता माजेल. याचा त्रास जनतेला होईल, अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.
यावेळी गोदड महाराजवंचे मानकरी मेघनाथ पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे, अनिल काकडे, सुरेश ख्रिस्ती, तात्यासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.
फोटो -कर्जत
कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे आज गोडड महाराज मंदिरात वाचन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.