स्व. माधवलाल मुनावत यांच्या निधनाबद्दल शोकसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:04+5:302021-02-10T04:20:04+5:30
राहाता : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्व. माधवलाल मुनावत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी शोकसभेचे ...
राहाता : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्व. माधवलाल मुनावत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेत अनेक मान्यवरांकडून स्व. मुनावत यांच्या आठवणींना उजाळा देत शब्दरूपी श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशमुख म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांत स्व. मुनावत यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा समाजसेवक हरपला.
डॉ. पिपाडा म्हणाले, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून त्यांनी गरजूंना मदत केली. व्यवसायात यश संपादन केले, त्याचबरोबर माणसे जोडण्याचेही काम केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर मिलाफ झालेला होता. आपत्तीग्रस्त दोन अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. यावेळी कोविडच्या काळात ज्यांनी आपला प्राण गमावला अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, उद्योजक दिलीप रोहोम, ॲड. रघुनाथ बोठे, बाबूलाल पिपाडा, भाऊसाहेब जेजुरकर, दिलाप रोहोम, नाना बावके, सरपंच राजेंद्र दंडवते, दत्तात्रय घोगळ, दिलीप सातव, देवेंद्र भवर, ॲड. रघुनाथ बोठे, पंकज लोढा, गणेश सोमवंशी, विजय मोगले, शशिकांत लोळगे, कैलास सदाफळ, डॉ. संजय बोरा, नेमीचंद लोढा, पंकज मुथा, ज्ञानेश्वर सोमवंशी, सुनील बोठे, अनंतगुरू लावर, डॉ. बापूसाहेब पाणव्हाणे, राजेंद्र दरंदले, राजेंद्र वाबळे, राजेंद्र निकाळे, सुरेंद्र सांड, दशरथ तुपे, प्रा. राजेंद्र निकाळे, सचिन मेहेत्रे, सुरेंद्र सांड, विजय मुथा, कमलनयन टाकी उपस्थित होते.
..
..फोटो०९-स्व. मुनावत श्रद्धांजली
..
ओळी-राहाता शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्व. माधवलाल मुनावत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना राहाता येथे शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.