शिर्डीत टुरिझम पोलीस केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:52+5:302021-02-17T04:26:52+5:30
पर्यटनस्थळ असो वा धार्मिक स्थळी वर्षभर भाविकांची गर्दी असते. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून समोर आले असून रोज हजारो ...
पर्यटनस्थळ असो वा धार्मिक स्थळी वर्षभर भाविकांची गर्दी असते. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून समोर आले असून रोज हजारो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनला हजेरी लावतात. मात्र अनेकदा पाकीटमारी असेल अथवा मिसिंग झाले तर भक्तांना मंदिर परिसरापासून दूर असणाऱ्या पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागतात. याच समस्येवर उपाय शोधत मंदिर परिसरात आजपासून टुरिझम पोलीस केंद्राचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हे केंद्र सुरू झाले.
यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, साई संस्थांचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, प्रांताधिकारी गोवींद शिंदे, पोलीस निरिक्षक प्रविण लोखंडे आदी यावेळी उपस्थीत होते.