कारागृहातील कैद्यानं मिळवली कायद्याची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:23 PM2018-06-14T12:23:53+5:302018-06-14T12:24:00+5:30

कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे.

Law graduate received prison term | कारागृहातील कैद्यानं मिळवली कायद्याची पदवी

कारागृहातील कैद्यानं मिळवली कायद्याची पदवी

विसापूर(अहमदनगर) : कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे.
पंकज कांबळे सोलापूर शहरातील रहीवाशी आहे. त्याने १९९२ मध्ये सोलापुरातील कॉलेज मधून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. वैवाहिक जीवनात पत्नीने आत्महत्या केली. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. २००५ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु त्याची सुधारलेली वर्तवणुक पाहून त्याला २०१३ पासून विसापूर खुल्या जिल्हा कारागृहात वर्ग करण्यात आले. त्यानंतर विसापूर कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंग अधिकारी बाळकृष्ण जासुद, राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाह्यस्थ प्रवेश घेतला. कारागृहाचे अधिका-यांनी त्याला अभ्यासासाठी सहकार्य केले. त्याने त्याच्या सजा पूर्ण होण्याचे शेवटच्या टप्प्यात एलएलबीची पदवी संपादन करण्यात यश मिळविले. त्याची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यासाठी एक वर्ष बाकी आहे. त्या नंतर वकीलीचा व्यवसाय करणार आसल्याचे पंकज कांबळे याने सांगितले.

‘‘कायद्यामुळे मला शिक्षा झाल्यावर कारागृहात आभ्यास करुन एलएलबी पदवी घेण्याचा विचार केला. त्यानुसार कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंग अधिकारी बाळकृष्ण जासुद, राजेंद्र पवार यांनी अभ्यासा करीता सहकार्य केले. त्यामुळे हे यश संपादन करु शकलो. एक वर्षानंतर कारागृहातुन सुटका झाल्यानंतर चांगल्या वकिलाचे मार्गदर्शनाखाली व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे.’’ - पंकज कांबळे, बीकॉम एलएलबी कैदी, विसापूर कारागृह.

Web Title: Law graduate received prison term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.