श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 02:38 PM2020-09-19T14:38:21+5:302020-09-19T14:38:29+5:30

बापुंनी यशवंतराव चव्हाण पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पर्यंत जिव्हाळ्याचे संबंध जोपासण्याचे काम केले. राजकारणात कुणाचा राग द्वेष केला नाही. त्यामुळे श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

Leaders of Shrigonda come together in Thorat to awaken their thoughts | श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात

श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात

श्रीगोंदा : सहकारी साखर कारखानदारी पाटपाणी शिक्षणाची मंदिरे उभी करून श्रीगोंद्याचा चौफेर विकास करणारे शिवाजी बापू  नागवडे  आजही समाजाच्या हृदयात कायम आहेत त्यांनी घालून दिलेला त्याग निष्ठा तत्व आणि पारदर्शकता या मार्गाने पुढे जावे लागणार आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शिवाजीराव नागवडे यांचे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण 

नागवडे साखर कारखान्याचे माध्यमातून राजेंद्र नागवडे यांनी ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या सेंट्रल आॅकसीजन सिस्टीम कोविड 19 हेल्थ केअर सेंटर. श्रीराम सहकारी पतसंस्था श्रीगोंदा शाखा  तसेच अॅड अनिकेत दिपक भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन   करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले कि शिवाजीराव नागवडे यांनी दक्षिणेत पहिला साखर कारखाना उभा केला आणि त्यातून सहकाराचा वटवृक्ष झाला परिसरातील समाजाचे जीवनमान अर्थकारण बदलले आहे  नागवडे साखर कारखान्याचे राज्यात नाव आहे राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे यांनी हा वसा पुढे चालविला आहे 

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले कि  शिवाजी बापूंनी तालुक्याच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे नागवडे साखर कारखान्याचे माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानमंदिरे उभी त्यामुळे अनेक गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी झाली आहे आहे मुख्य मंत्री स्व  विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात यांनी बापूंवर अजीव प्रेम केले त्यांचे मार्गदर्शन पुढे जावे जावे लागणार आहे 

 

 

Web Title: Leaders of Shrigonda come together in Thorat to awaken their thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.